Posts

Showing posts from July, 2026

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ९ : आंब्यांचे दिवस

Image
काही चित्रपटात किंवा नाटकात एखाद्या सामान्य माणसाला एक दिवसासाठी राजा किंवा मुख्यमंत्री करतात. हे गोष्टीत ठीक आहे. प्रत्यक्षात असं कधी होणार नाही. तरी पण कल्पना करायची झाली तर एक जानेवारीला आपण मुख्यमंत्री व्हायचं, असं मी कधीचंच ठरवलं आहे. एक जानेवारीच का? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक जानेवारीला हापूस आंब्याची पहिली पेटी कोकणातून भेट म्हणून येते, (असं ऐकलं आहे) म्हणून!! खरं खोटं वर्षा बंगल्याच्या रहिवाशांना ठाऊक. अश्या ह्या भाग्यवान माननीयांना वगळलं, तर बाकी जनतेचे आंब्याचे दिवस एप्रिल-मे महिन्यात सुरू होतात. वर्तमानपत्रात ‘फळांच्या राजाचे पुण्यात आगमन’ वगैरे बातम्या झळकतात. काही लोकं तातडीने आंबे खायला सुरू करतात, तर काही अक्षय्यतृतीयेला. पण हळूहळू करत प्रत्येक घरात आंबे आपलं बस्तान बसवतात. मोसमाच्या शेवटी उत्तरेकडचे आंबे येतात. हापूस-पायरीला चटावलेले मराठी जीव त्या आंब्याचं जरा कमी उत्साहाने स्वागत करतात. तोवर पाऊस येतो. आंब्याची चव उतरते आणि त्या वर्षीचे आंब्यांचे दिवस संपतात. शेती करायला लागल्यापासून आमचे आंब्यांचे दिवस मात्र नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू होतात आणि पार जून-...