Posts

Showing posts from May, 2017

भाग-८ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक) भाग-7 वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/05/blog-post_19.html बागेश्वर- काठगोदाम – दिल्ली (१७ व १८ जून २०१४) आज बसने नक्की जायचं नाही, जीपने जायचं हे नक्की होत. पण जातीच्या मोशन सिक लोकांना बस / जीप/ विमान / कार / रिक्षा सगळं सारखंच! त्यामुळे सुजाताने तिची मोशन सिकनेस न होण्यासाठीची अत्यावश्यक गोळी जीपमध्ये बसण्याआधीच घेतली आणि ती ‘म्युट मोड’ मध्ये गेली! प्रवासात ती काही खात नाही, पीत नाही, बोलत नाही, हसत नाही, काहीच करत नाही. झोपेतून जाग आलीच, तर अजून किती किलोमीटर प्रवास उरलाय, ह्याचा अर्धोन्मीलित डोळ्यांनी अंदाज तेवढा घेते. आजही सीन तसाच होता. तिने झोपेच्या पहिल्या पायरीवर असताना बागेश्वरला देवेन सरांचा निरोप घेतला. आम्हाला पाणी, थोडा खाऊ विकत घेण्याच्या सूचना दिल्या आणि आधीच झोपेत असलेली पुन्हा झोपून गेली. बाकीची मंडळीही थकलेली होतीच, त्यामुळे ड्रायव्हरच्या शेजारचे सोडून सगळेच हळूहळू झोपले. पण ड्रायव्हरला हे सुख पाहवलं नाही. त्याने मोठ्या आवाजात खास प्रवासात ऐकण्यासाठी जी गाणी निर्माण

भाग-७ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

Image
आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक) भाग-6 वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/05/blog-post_17.html द्वाली- धाकुरी (१५ जून २०१४) मनासारखी झोप झाल्यावर सकाळी उठायला किती बरं वाटत. नाहीतर घरी झोपताना ‘ उशीर झाला , झोपायला हवं ’ असं म्हणायचं आणि उठताना ‘ उशीर झालं , उठायला हवं ’ असं. झोप पूर्ण झाली म्हणून उठायचं सुख गडबडीच्या दिनक्रमात फार वेळा मिळत नाही. ट्रेकमधला सगळ्यात जास्त चालण्याचा दिवस आजचाच होता. आज तब्बल वीस किलोमीटर चालायचं होतं. स्वरुपने आम्हाला आदल्या दिवशी ‘ आपको तो जातेजाते रात हो जायेगी. बच्चे टाईमपे पोहोचेंगे ’ असा आशीर्वाद दिला होता. त्याचा परिणाम म्हणून भराभर आवरून चालायला सुरवात केली. पुन्हा तोच काफनी नदीचा डगमगता पूल पार केला. नदीच्या वाळवंटात पसरलेल्या दगडगोट्यांच्या रस्त्याने चालायला लागलो. इथे उभं राहिलं , की मागच्या जूनमध्ये दोन्ही नद्यांचं मिळून किती प्रचंड पात्र झालं असेल , ह्याचा आवाका डोळ्यासमोर येत होता. ते प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांना किती भीती वाटली असेल , ह्याचा अंदाज येत होता. ट्रे

भाग-६ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

Image
आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक) भाग-5 वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/05/blog-post.html फुरकीया – झिरो पॉइंट – फुरकिया- द्वाली (१४ जून २०१४) झिरो पॉंईंट सहा वाजता निघायचं होतं. सगळ्यांना मिळून एकच टॉयलेट असल्यामुळे आवरायला वेळ लागणार , हे स्पष्ट होतं. बऱ्याच वाटाघाटी होऊन , मग सर्वानुमते साडेचाराला उठायचं ठरलं. अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने साडेचारचा गजर लावला असता. पण त्यात काय मजा ? म्हणून अश्विनीने साडेतिनाचा गजर लावला होता! रोज काही इतक्या लवकर उठायला लागायचं नाही , पण आम्हाला सर्वांना लवकर उठायची सवय व्हावी , ह्या उदात्त हेतूने तिने पहिल्या दिवसापासून साडेतिनाचाच गजर लावला होता. उठण्यात आळस होऊ नये , म्हणून ते घड्याळ ती जवळ न ठेवता सॅकमध्ये ठेवायची. फोनचा गजर वाजला की सगळे , ’ आश्विनी..... ’ असा आरडाओरडा करायचे. मग ही काळोखात आधी आपली सॅक शोधणार , असंख्य प्लास्टिक पिशव्यांचा कुरकूर आवाज करणार. फोन मिळाला , की त्याचा ठणाणा करणारा आवाज बंद करून ‘ आहे वेळ अजून उठायला , झोपा-झोपा ’ अशी आमची समजूनही घाल