Posts

Showing posts from February, 2019

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-१२ (यात्रेविषयी थोडेसे)

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा  भाग ११ : गाला ते पुणे https://aparnachipane.blogspot.com/2018/12/blog-post.html यात्रेविषयी थोडेसे: भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार खाते ही यात्रा दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान आयोजित करते. उत्तम प्रकृती आणि भारतीय पासपोर्ट असणे हे गरजेचे आहे. वयोमर्यादा अठरा वर्षे ते सत्तर वर्ष आहे. ह्या अटी पूर्ण करू शकणारा कोणीही भारतीय नागरिक ही यात्रा करू शकतो. नारायण आश्रम ते लीपुलेख हे दोनशे किलोमीटरचे अंतर सात-आठ दिवसात पार करायचे असते.  वैविध्याने नटलेल्या या सर्व प्रदेशाला रौद्र अश्या निसर्गाचे वरदान लाभले आहे. या प्रदेशातून जाताना यात्री आपले देहभान विसरतो. भारत सरकार आणि कुमाऊ मंडळ विकास निगम ह्या यात्रेचे नियोजन अतिशय पद्धतशीर, नेटके करतात. क्रमाक्रमाने वरची उंची गाठली जात असल्याने दिवसेंदिवस आपले शरीर आणि मन यात्रेत समरस होते. विरळ हवेचा त्रास फारसा जाणवत नाही. इतक्या कष्टांनंतर आपण जेव्हा मानस व कैलासच्या परिक्रमा करतो, ती अनुभूती शब्दात वर्णन करणे खरच शक्य नाही. ती सगळ्यांनी आपली आपणच अनुभवायची. यात्रेसंबंधीची जा