Posts

Showing posts from November, 2019

मी वाचलेलं पुस्तक : थ्री डॉटर्स ऑफ चायना

Image
मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यासाठी येथील दुव्यावर टिचकी मारा. धन्यवाद! थिओडोर बून (स्कँडल) लेखक: जॉन ग्रिशॅम https://aparnachipane.blogspot.com/2017/08/blog-post_29.html                                   --------------------------------------------------------------- पुस्तकाचं   नाव       Wild Swans : Three daughters of China लेखिका             Jung Chang प्रकाशक                       Simon & Schuster; Reprint edition (August 12, 2003)  ISBN-10: 0743246985            ISBN-13: 978-0743246989 भारत हा शेतीप्रधान देश आहे , हे वाक्य वाचत-ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. पण आता ते वाक्य ‘ भारत हा निवडणूकप्रधान देश आहे ’ असं बदलायला हवं , असं वाटायला लागलं आहे. एक झाली की दुसरी , इथली झाली की तिथली. निवडणुका काही   थांबत नाहीत. सभा , भाषणं , मिरवणुका , आश्वासनं , आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असतो. ह्या वातावरणात एकतर राजकारण निष्णात होतात , नाहीतर   ' मला नाही राजकारणात इंटरेस्ट. सगळे इथूनतिथून सारखेच. कोणीही निवडून आलं तरी आपल्या रोजच्या आयुष्यात काही फरक पडत ना