Posts

Showing posts from May, 2023

मी वाचलेलं पुस्तक : राजधानीतून

मी वाचलेलं पुस्तक : राजधानीतून…  लेखक अशोक जैन श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत. राजधानीतून…’ ह्या पुस्तकाच्या पहिल्या भागात, जैनांना दिसलेल्या दिल्लीबद्दल, ते तिथे असताना घडलेल्या काही घटनांबद्दल, व्यक्तींबद्दल लिहिलं आहे. दुसऱ्या भागात त्यांनी लिहिलेल्या सुमारे पाचशे वार्तापत्रांपैकी काही निवडक वार्तापत्रे दिली आहेत. अत्यंत वेधक अशा आठवणी मार्मिक, ओघवत्या भाषेत लिहिल्या असल्याने पुस्तक वाचायला फार मनोरंजक झाले आहे. आता ह्या पुस्तकात उल्लेख असलेले फारच कमी नेते राजकारणात सक्रिय आहेत. काही निवृत्त झाले, काहींना जनतेने निवृत्त केलं तर काही काळाच्या पडद्याआड गेले. ज्या संसद भवनाबद्दल, सेंट