Posts

Showing posts from August, 2018

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा (भाग - ४) सिरखा ते गुंजी

Image
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा  भाग ३ : दिल्ली ते सिरखा https://aparnachipane.blogspot.com/2018/06/blog-post_28.html दिनांक १६ जून २०११ ( सिरखा   ते गाला) यात्रेतलं   रोजच वेळापत्रक साधारण सारखंच असायचं. आम्ही  सकाळी ५.०० ला उठायचो. लगेच चहा / कॉफी. प्रातर्विधी उरकून ६.०० ला नाश्ता. त्याबरोबर   बोर्नविटा. तोपर्यंत पोर्टर यायला लागायचे. सामान त्यांच्याकडे सोपवून चालायला सुरवात.   कँपवरपोचल्या पोचल्या स्वागताला सरबत किंवा ताक! मग जेवण. जर चालण्याच अंतर जास्त असेल तर रस्त्यात एखाद्या ठिकाणी जेवायची सोय केलेली असायची. दुपारी पुन्हा चहा/ कॉफी. संध्याकाळी सूप. रात्री ७ वाजता जेवण आणि झोप. यात्रेत सगळीकडे कांदा-लसूण   विरहित   जेवण देतात. प्रत्येक जेवणात हिरव्या पालेभाज्या असतातच. रात्री झोपण्याआधी त्या   कँपचे   व्यवस्थापक ‘ सबने   खाना खा   लिया ?  कोई   भूखा-प्यासा   तो नही   है ?  बीना   खाना   खाये   मत   सोना. ’ अशी चौकशी करून जायचे. इतकी काळजी घेतल्यामुळे आपण कोणीतरी विशेष व्यक्ती झालो आहोत अस वाटायचं! बहुतेक सगळ्या   कँपवर   सौर   ऊर