Posts

Showing posts with the label आषाढी वारी

ज्याची त्याची वारी.....

Image
साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात पुण्याच्या वर्तमानपत्रात ‘पालखीच्या व्यवस्थेसंदर्भात कलेक्टर कार्यालयात उद्या बैठक’ अशा स्वरूपाची बातमी येते आणि मग पाठोपाठ ‘पालखी मार्गाची दुरावस्था’ वगैरे मथळ्यांखाली पालखी मार्गाच्या बाजूला पडलेला राडारोडा, रस्त्यावरील खड्डे वगैरे छायाचित्र येतात. स्थिर, संथ तळ्याच्या पाण्यात कोणीतरी गमतीने दगड टाकावा, आणि त्याचे तरंग तळ्याच्या काठापर्यंत हळूहळू पसरत जावे, तसा ‘पालखी’ हा विषय पुण्यात आणि परिसरात पसरत जातो. जसा जसा देहू किंवा आळंदीहून पालखीच्या प्रस्थानाचा दिवस जवळ येऊ लागतो, तसा त्या संदर्भातील बातम्यांना आणि चर्चेलाही रंग चढतो. पुण्यातले बरेच लोकं पुणे-सासवड हा टप्पा करतात. सकाळी मैदानांवर-टेकड्यांवर चालायला जाणाऱ्या गटांमध्ये, हौशी ट्रेकर्समध्ये, भाविक मंडळींच्या गटात, अगदी सगळीकडे पुणे-सासवड हा टप्पा गर्दी टाळून कसा करता येईल, ह्या विषयावर सूचना-सल्ल्यांचं आदान-प्रदान हिरीरीनं व्हायला लागत. पुण्यात जागोजागी असलेल्या विठोबाच्या मंदिरांची रंगरंगोटी होताना दिसते. वर्तमानपत्रात निरनिराळ्या संघटनांच्या ‘वारकऱ्यांच्या चरणसेवेसाठी नावे नोंदवा’ अ...