Posts

Showing posts from October, 2017

दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-३ (अंतिम)

Image
दक्षिणेतील डोंगररांगा (भाग-2) वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/10/2.html भाग-3 कुरुंगनी ते सेंट्रल स्टेशन ट्रेकला यायचं ठरवणं , तयारी ह्या सगळ्यातून पार पडत इथे आलो. ही आत्ताच तर सुरवात झाली आहे , असं म्हणता म्हणता अर्धा ट्रेक संपला सुद्धा. आता फक्त आज आणि उद्या. मग परत जीप , बस, ट्रेन आणि घरी परत.  आजचा दिवस सगळ्यात कठीण आहे , असं सगळे सांगत होते. त्यामुळे थोडी काळजी वाटत होतीच. त्यात पावसाची लक्षणं दिसत होती. सॅकमधलं सामान प्लास्टिक पिशव्यांमध्ये असल्याने ते भिजायची भीती नव्हती. सर्व मंडळींनी रेनकोट चढवले. रेनकोट घालून चालताना खूप घाम येतो. पावसापासून बचाव करावा , तर घामेघूम होऊन भिजायला होतच. नारळी-पोफळीच्या बागा बघत सगळे चालत होते. थोड्याच वेळात जंगलात शिरलो. जरा कठीण चढ सुरू झाला. श्वासाचा वेग वाढला आणि चालायचा कमी झाला.   तरुण आणि तडफदार मंडळी आम्हाला न थांबता चालत राहा , असे सल्ले न कंटाळता देत होती. ह्या सगळ्यांना सात वेळा पळत पळत डोंगर चढायला लावला पाहिजे , मग कळेल ; असे दुष्ट विचार मनात येत होते. पण बोलणं शक्य नसल्यामुळे

दक्षिणेतील डोंगरवाटा (कोडाईकॅनाल मुन्नार ट्रेक) भाग-2

Image
दक्षिणेतील डोंगररांगा (भाग-1) वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/10/blog-post.html कोडाईकॅनाल ते वेल्लाकवी ट्रेकमध्ये ' शिट्टी ' हे सर्वस्व असते. सगळा दिनक्रम शिट्टीच्या तालावर चालतो. सकाळी बेड टी , व्यायाम , ब्रेकफास्ट , चहा , पॅक लंच इतक्या शिट्ट्या आणि कँपवर पोचल्यावर वेलकम ड्रिंक , चहा , नाश्ता , सूप , जेवण आणि बोर्नव्हिटा एवढ्या (तरी!) शिट्ट्या वाजायच्या!! तरी इथे बऱ्याच  कँपवरच्या लीडर लोकांना भाषेचा अडसर असल्यामुळे सूचना-सेशन रद्द झालं. नाहीतर त्याही शिट्ट्या असतात. कोडाईकॅनालच्या बेस कँपच्या  एका खोलीत सात जणी होतो. वयोगट पंचेचाळीस ते तेरा! त्यामुळे कपड्यांपासून गप्पांच्या विषयापर्यंत खूप व्हरायटी होती. आजच्या दिवस अंघोळीसाठी गरम पाणी ही महत्वाची सोय होती. पुढे चार दिवस अंघोळीच्या गोळ्यांवर भागवायचं असल्याने समस्त महिलावर्गाने झटाझट अंघोळी उरकल्या.  इथेतिथे पसरलेल्या सामानाच्या मुसक्या आवळून ते सॅकच्या भव्य उदरात गडप करण्यात आलं. नाश्ता झाला. दुपारच्या जेवणाचा डबा , पाण्याच्या बाटल्या भरल्या गेल्या. चालायचे बूट , टोप्य

दक्षिणेतील डोंगरवाटा (कोडाईकॅनाल मुन्नार ट्रेक) भाग-१

Image
रोजचं जगणं धोपटमार्गावरून घरंगळत असत. सकाळच्या गजरापासून रात्रीच्या जांभईपर्यंत साधारणपणे सारखंच. ठराविक वयानंतर हे असच असणार ,  हे आपण कबूलही केलेलं असत. तीच नोकरी ,  तेच सहकारी ,  सरावाच झालेलं तेचतेच काम. घरीही तसंच. ठराविक रस्ता ,  त्यावरचे ठराविक सिग्नल. काही वाईट नसतं ह्यात. असं स्थैर्य मिळावं ,  म्हणून तर आपण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय सुरू करतो. कौटुंबिक ,  आर्थिक स्थैर्य मिळालं ,  की स्वतःची पाठ थोपटून घेतो. पण ह्या चौकटीच्या बाहेरच्या आयुष्याबद्दल खूपसं कुतूहल ,  थोडी खोडकर उत्सुकता असतेच की मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेली. थोड्या दिवसांसाठी मुक्त ,  निर्भर जगावं आणि तरतरीत ,  चकचकीत होऊन पुन्हा आपल्या उबदार ,  सुरक्षित घरी परत यावं ,  अशी काहीशी खट्याळ ओढ लागते. मग कोणी थंड हवेच्या ठिकाणी ,  कोणी देवदर्शनाला जातं. आमच्यासारखे काही जरा जास्त वेडे ट्रेकिंगला जातात. अशाच एका वेडाच्या झटक्याच्या प्रभावाखाली आम्ही यूथ हॉस्टेल ह्या संस्थेने आयोजित केलेल्या  ' कोडाईकॅनाल ते मुन्नार '  ह्या सात दिवसांच्या ट्रेकला जायचं ठरवलं. हे  ' ठरवणं '  म्हणजे श