Posts

Showing posts from April, 2017

भाग-४ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

Image
आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक) भाग-3 वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/04/blog-post_20.html धाकुरी -खाती   (११ जून २०१४) हा ट्रेक ट्रेकिंगच्या अवघडपणाच्या पट्टीवर फार वर नसावा. कागदोपत्री (तरी!) ह्या ट्रेकला तसा सोपा मानतात. त्यामुळे ज्यांना घाई असते , असे ट्रेकर्स दोन-दोन कँप एका दिवशी करून अगदी कमी दिवसांमध्ये ह्याच गणित बसवतात. आम्ही मात्र ह्या फंदात पडलो नव्हतो. आम्ही जाताना निवांतपणे एक-एक कँप करत जाणार होतो. जातानाच्या चार दिवसांचं चालायचं अंतर येताना दोन दिवसांमध्ये संपवणार होतो. ह्याचा फायदा म्हणजे अगदी भल्या पहाटे उठा ,  भराभर   आवरून निघा अस शेड्यूल नव्हतं. घराबाहेर , त्यातून अशा निसर्गरम्य जागी असल्यावर तशीही फार   उशीरापर्यंत   झोप लागतच नाही. आदल्या दिवशी पाहिलेलं दृश्य आता पहाटेच्या कोवळ्या उजेडात कसं दिसेल , ह्या उत्सुकतेने लवकर जाग येतेच. पण उठल्यानंतर व्हरांड्यात बसून एकट्याने किंवा मैत्रिणींबरोबर आरामात कॉफी प्यायला , गप्पा मारायला   वेळ मिळत होता! नक्की किती वर्षांपूर्वी ही मजा घेतली होती , तेसुद्धा

भाग ३-आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

Image
आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक) भाग-2 वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/03/2.html काठगोदाम – बागेश्वर – लोहारखेत (९ जून २०१४) २०११ मध्ये कैलास-मानस यात्रा केली तेव्हा कुमाऊँ मंडळाच्या ह्याच गेस्ट हाऊसमध्ये जाता-येता दोन्ही वेळा जेवायला थांबलो होतो. जाताना यात्रा कशी होईल ह्या विचाराने काळजी दाटून आली होती आणि येताना ‘आज यात्रेचा शेवटचा दिवस’ ह्या कल्पनेने गलबलायला झालं होत. परत येताना एका छोट्या पण अत्यंत हृद्य कार्यक्रमात यात्रा पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे इथेच मिळाली होती. त्याच जागी तीन वर्षानंतर आले होते. यात्रेच्या, सहयात्रींच्या आठवणी येत होत्या. जागा तीच असली, तरी ह्या वेळेला ग्रूप , जायची जागा आणि प्रवासाचा मूड.. सगळच वेगळ होत. आज आम्हाला बागेश्वर पर्यंत जीप किंवा बसने जायचं होत. तिथे पोचल्यावर कुमाऊँ मंडळाच पॅकेज सुरू होणार होत. तिथे पोचल्यावर दुपारच जेवण आणि जास्तीच सामान जमा करणे हा कार्यक्रम उरकला, की पुढे जीपने ‘सॉंग’ ह्या गावापर्यंत जायचं होत. तिथून आमची चालायला सुरवात होणार होती. तीन किलोमीटर चालल्यावर लोह