Posts

Showing posts from February, 2021

दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग चौथा - मॉन्टाना ते वॉशिंग्टन स्टेट

Image
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा भाग तिसरा :  नेब्रास्का ते मॉन्टाना      https://aparnachipane.blogspot.com/2021/02/blog-post.html  २९ सप्टेंबर २०१९ बिलिंग्ज, मोन्टाना ते आयडाहो फॉल्स, आयडाहो  आजच्या वादळाचे ढग आमच्या मनावर गेल्या चार दिवसांपासूनच घोंघावत होते. सकाळी उठून बाहेर बघितलं, तर रात्रीतून कधीतरी बर्फ पडायला सुरवात झाली होती आणि रस्त्यांवर-छपरांवर बर्फ साठला होता. वादळाच्या आधी  जो रस्ता  ठरवला होता, त्याची पुन्हा एकदा चाहूल घेतली. पण तिथे ३० ते ३६ इंच बर्फाची शक्यता होती. यलोस्टोन नॅशनल पार्कचे बरेचसे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. त्यामुळे ह्या ट्रीपमध्ये तिथे जाता येणार  नाही, हे आता अगदी निश्चित झालं. मुळात ठरवलेला रस्ता असा होता बदललेला रस्ता असा होता कुठेही फिरायला जाताना ठरवलेलं सगळं आणि त्याबरोबर अनपेक्षितपणे काहीतरी छान बघायला, अनुभवायला मिळावं, असं वाटतंच. पण तसं कधीतरीच होतं. बहुतेक वेळा काहीतरी बघायचं राहतंच. कधी उशीर झाला म्हणून तर कधी दुरुस्ती चालू आहे म्हणून कधी पुरेशी माहिती मिळाली नाही म्हणून. आज निसर्गाची कृपा नव्हती. जा

दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग तिसरा- नेब्रास्का ते मॉन्टाना

Image
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा  भाग दुसरा : व्हर्जिनिया ते नेब्रास्का https://aparnachipane.blogspot.com/2020/01/blog-post_8.html २६ सप्टेंबर २०१९- लिंकन,नेब्रास्का ते की स्टोन, साऊथ डाकोटा भारतासारख्या देशात भाषा, राहणी, चालीरीती, परिधान अशा बऱ्याच गोष्टींचं भरपूर वैविध्य आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यांची जी पुनर्रचना झाली, ती भाषांच्या आधारे. आपल्याकडच्या राज्यांच्या किंवा जिल्ह्याच्याही सीमारेषा साधारणपणे नद्यांच्या असतात. नदीच्या अलीकडच्या काठाला हे राज्य तर पलीकडच्या काठाला ते राज्य असतं. अमेरिकेत ‘भाषावार प्रांतरचना’ हा प्रश्न आलाच नसावा. त्यामुळे काही राज्यांच्या सीमारेषा नदीकाठी तर काही राज्यांच्या सीमारेषा नकाश्यावर पट्टी ठेवून आखलेल्या सरळ रेषा आहेत. अगदी काटकोनात एकमेकींना छेडणाऱ्या ह्या रेषांमुळे ह्या राज्यांना ‘चौकोनी राज्यं’ असं यथायोग्य नाव मिळालं आहे. काही ठिकाणी चार राज्यांच्या सीमा एकत्र येतात. तिथे तर एकेक पाऊल एका-एका राज्यात आणि हात पसरले, तर पसरलेले हात अजून दोन राज्यात अशी गंमत होते!  आता आम्ही ज्या भागात होतो, ते अशा चौकोन