Posts

Showing posts from September, 2018

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-७ (परिक्रमा महाकैलासाची)

Image
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा  भाग ६ : लिपूलेख खिंड ते दारचेन https://aparnachipane.blogspot.com/2018/09/blog-post_20.html दिनांक २३ जून २०११ ( दारचेन ते डेरापूक ) आज आमची कैलास परिक्रमा सुरू होणार होती. परिक्रमा मार्गावर फोनची सोय नाही. त्यामुळे सगळ्यांनी घरी फोन करून आपापली खुशाली कळवली.  परिक्रमा संपवून पुन्हा दारचेनला आलो, की नंतरच घरच्यांचा आवाज ऐकायला मिळणार होता. तीन दिवसांनी पुन्हा ह्याच कँपवर येणार होतो. त्यामुळे परिक्रमेच्या तीन दिवसाकरता लागेल तितकेच सामान लहान   सॅक मध्ये घेतलं होत. बाकीचं सामान   इथे दारचेनला ठेवलं होतं. २० , २१ , २२ जून तीन दिवस आराम झाला होता. आता परत चालायला सुरवात करायची होती. हे चालणं   साधं-सरळ नव्हतं , खूप कठीण होतं. तीन दिवसांच्या आणि ५४ किलोमीटरच्या परिक्रमेला दारचेन ह्या १५५५० फुटांवर असलेल्या कँपपासून सुरवात होते. परिक्रमेचा पहिला मुक्काम २२ किलोमीटर दूर फुटांवरील डेरापुक ह्या ठिकाणी असतो. त्या जागेची समुद्रसपाटीपासून उंची १६३०० आहे.परिक्रमेतील सगळ्यात उंच ठिकाण म्हणजे ‘ डोल्मा पास ’ किंवा ‘ पार्वती शीला

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-६ (लीपुलेख पास ते दारचेन)

Image
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा भाग ५ : गुंजी ते लिपूलेख खिंड https://aparnachipane.blogspot.com/2018/09/blog-post.html दिनांक २० जून २०११ ( लीपूलेख पास ते तकलाकोट ) लिपूलेख खिंडीचा खडतर प्रवास संपवून आम्ही चीनच्या हद्दीत आलो होतो. चीनचे काही लष्करी अधिकारी ,  हिंदी बोलू शकणारे दोन गाईड व त्यांचे मदतनीस आम्हाला चीनमध्ये घेऊन जायला आणि पहिल्या   बॅच ला भारताच्या सीमेपर्यंत सोडायला आले होते. पहिल्या आणि आमच्या तिसऱ्या  बॅचची देवाणघेवाण करताना त्या अडनेड्या जागी चांगलीच गडबड होत होती. चीनच्या अधिकाऱ्यांकडे  हातात धरण्यासारखे ध्वनिवर्धक होते. ह्या लहानश्या गोष्टीमुळे त्यांना सगळ्यांना सूचना देणे फार सोपे होत होते.  देवाणघेवाण पूर्ण झाल्यावर आम्ही चालायला सुरवात केली. दोन देशांमधील सीमारेषा तर मानवनिर्मीत आहे. निसर्गाचे दोन भाग तर असूच शकत नाहीत. त्यामुळे ह्याबाजूलाही तसाच बर्फ, तशाच अवघड पायवाटा होत्या. मनात मात्र आपण आपला देश सोडून परक्या देशात आलो आहोत, ही भावना वारंवार येत होती. असं थोडा वेळ चालल्यावर चांगलीच खोल दरी आली. ती बघून सगळ्यांच्या उर