Posts

Showing posts from January, 2017

तरंगायचे दिवस! (भाग-४: अंतीम)

तरंगायचे दिवस!-भाग 3  वाचण्यासाठी ह्या दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/01/blog-post_94.html कल्याण ते मुंब्रा : एक धाडसी प्रयोग पोहायला शिकलो, खाडी क्रॉस करून झाली. छान ग्रूप तयार झाला. पण पुढे काय? मग कल्याण ते डोम्बिवली आणि नंतर कल्याण ते मुंब्रा पोहत जायचं, अशी कल्पना कोणाच्या तरी डोक्यात आली. कल्पना तर छानच होती. पण हे करायचं कस, ह्याची कोणालाही सुतराम माहिती नव्हती. बऱ्याच वर्षांपूर्वी काही जण कल्याण ते डोम्बिवली हे सात-आठ किलोमीटर अंतर पोहून गेले होते, अशी आणि तेवढीच माहिती काही जण द्यायचे, पण आम्हाला तसा त्या माहितीचा काहीही उपयोग नव्हता. परमेश्वराच्या ‘गुगल’ ह्या अवताराचे आगमन अद्याप पृथ्वीतलावर झालेले नसल्याने, तो पर्याय नव्हताच. मग इकडे-तिकडे चौकश्या आणि त्याबरोबर अत्यंत जोरात प्रॅक्टीस   सुरू झाली. नियमित पोहायला येणारे आणि चांगल्यापैकी स्टॅमिना असलेले पंधरा-सोळा जण निवडले गेले. सुदैवाने आम्ही तिघी मैत्रिणी ह्या गटात होतो. तेव्हा आम्ही अकरावीतून बारावीत गेलो होतो. पोहण्याच्या आवडत्या कार्यक्रमात व्यत्यय नको, म्हणून आम्ही कधीही सुट

तरंगायचे दिवस! (भाग-३)

तरंगायचे दिवस! (भाग-३) तरंगायचे दिवस!-भाग 2 वाचण्यासाठी ह्या दुव्यावर टिचकी मारा.    https://aparnachipane.blogspot.com/2017/01/blog-post_71.html   व्यक्ती आणि वल्ली ह्या आमच्या जमावात तऱ्हेतऱ्हेची व्यक्तीमत्व गोळा झाली होती. वैयक्तिक आयुष्यात ते खूप शिकलेले किंवा प्रचंड यश मिळवलेले होते, असही नव्हत. पण त्यांची स्वभाववैशिष्ट्ये अत्यंत गमतीदार आणि विशेष होती, हे नक्की! सगळीच व्यक्तिमत्त्व आपापल्या गुणांनी अलौकिक होती, पण उदाहरणादाखल त्यातली ही काहीच......... राजू गुप्ते हा आमच्या घरापासून अगदी दोन मिनिटांवर राहायचा. चांगला उंच, रंगाने अंमळ काळा आणि अंतरी नाना कळा असलेल अस हे एक वेगळच रसायन होत. खाडीवर अत्यंत आवडीने वापरल्या जाणाऱ्या मराठीला राजूने अनेक शब्दरत्ने बहाल केली होती! पोहून परत येताना उद्याला कोणकोण आहे ही चर्चा व्हायचीच. राजूने चुकुनही ‘हो, मी आहे’ अस सरळ उत्तर दिल नसेल. कायम ‘आय अॅम, आय अॅम’ नाहीतर ‘हुं छु’ अस उत्तर मिळायचं. आमच्या घराची एक खिडकी अगदी रस्त्यावर उघडायची. तिथून जाताना कायम राजू ‘चला, चार हात मारायला,’ अस ओरडायचा. मग ती सकाळ असो नाहीतर रात्र! रा

तरंगायचे दिवस! (भाग-२)

तरंगायचे दिवस!-भाग 1  वाचण्यासाठी ह्या दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/01/blog-post_25.html पोहण्याचे धडे पहिल्या दिवशी मी आणि भाऊ दोघेही अमाप उत्तेजित झालो होतो. सकाळ होतेय कधी आणि आपण पाण्यात उडी घेतोय कधी, अशी घाई झाली होती. पण पाण्यात गेल्यावर मात्र हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही, ह्याची चांगलीच कल्पना आली. खाडीचे खारट पाणी नाकातोंडात गेल्यावर चांगली चविष्ट कल्पना आली, अस म्हटल तरी चुकीच होणार नाही...! पाठीला डबा बांधलेला असायचा. बाबा धरून हात-पाय मारायला शिकवायचे. आमचा जोरात आरडाओरडा आणि वेळप्रसंगी रडारडसुद्धा. आमच्या ह्या रडण्या-ओरडण्याचा बाबांवर काहीही परिणाम नाही. आई बिचारी होऊन काठावर बसून आमचा दंगा बघते आहे, असा साधारण सीन असायचा. वाड्यातल्या बायका आईला ‘कशाला खाडीवर पाठवताय, चांगली नाही हो खाडी लहान मुलांना.’ असे सल्ले देऊन तिला अजूनच हैराण करायच्या. असे काही दिवस गेल्यावर हळूहळू आम्हाला तरंगायला यायला लागल. एव्हाना आमच्या पोहण्याची बातमी आसपास फुटली होती. माझी शाळेतली एक मैत्रीण, सुजाता, तिचा धाकटा भाऊ विजय, हेही आमच्याबरोबर यायला लाग