Posts

Showing posts from June, 2018

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा (भाग - ३) दिल्ली ते सिरखा

Image
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा  भाग २ : दिल्ली मुक्काम  https://aparnachipane.blogspot.com/2018/06/blog-post.html दिनांक १२ जून २०११ (दिल्ली मुक्काम) आज तसा फार गडबडीचा दिवस नव्हता. सकाळी निवांत १० वाजता साऊथ   ब्लॉकला विदेश मंत्रालयाच्या कार्यालयात कार्यक्रम आणि हाय टी साठी जायचं होतं यात्रेची माहिती, यात्रेत खासकरून तिबेटमध्ये असताना घ्यायची काळजी ह्याची माहिती मिळणार होती. भारतातील यात्रेसाठी २२००० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट , इंडेमिनीटी   बॉन्ड   तसेच इतर कागदपत्रेही द्यायची होती. त्या कार्यक्रमातच नारंग सर सगळ्यांना भेटून ओळखी करून घेणार होते. हे सगळं झालं, की तिबेटमध्ये गेल्यावर जे विदेशी चलन लागत ते घेण्यासाठी सेंट्रल बँकेत जायचं होतं. मी आणि नंदिनी डॉलर पुण्याहून घेऊन आलो होतो. उद्यापासून प्रवास सुरु करायचा होता. ठराविक वेळेला, ठरलेल्या कार्यक्रमानुसार वागायचं होतं. सगळे खातील, तेच जेवायचं होतं. आजचा दिवस आम्हाला आमचा वेळ घालवायला मिळाला होता. आता अशी संधी यात्रा संपवून परत आल्यानंतरच मिळणार होती. हे लक्षात आल्यावर आम्ही बिलकुल वेळ न दवडत

कोणी वीज देता का वीज?

आमची पुण्यात बालेवाडी येथे काही प्रॉपर्टी आहे. तळमजल्यावर एक दुकान आहे आणि वर दोन मजले. बांधकामाच्या वेळी तिथे विजेचं एक मीटर घेतलं होतं. बांधकाम संपल्यावर ते नियमित मीटर करून झालं. त्यातले वेगवेगळे मजले वेगवेगळ्या व्यक्तींना भाड्याने / विकत द्यायचे झाले , तर वेगवेगळी मीटर हवी. म्हणजे तीन मजल्यांसाठी तीन आणि सामायिक वीज वापरासाठी म्हणजे जिन्यातले दिवे , पाण्याचा पंप , लिफ्ट इत्यादींसाठी एक मीटर पाहिजे. ह्या विचाराने मी तीन जास्तीची मीटर घ्यायची ठरवली. महावितरणची जी पत्रके वतर्मानपत्रात प्रसिद्ध होतात , त्यात ग्राहकाने स्वतः अर्ज करावे , एजंटकडे जाऊ नये , महावितरणची सेवा ग्राहकाभिमुख आहे. पुणे विभागाकडे मीटरचा तुटवडा नाही. त्यामुळे त्वरित वीजजोड देण्यात येईल , इत्यादी आशादायक वाक्ये असतात. त्यावर खूश होऊन मी हे सगळं प्रकरण स्वतः हाताळायचं ठरवलं. पण आता असं वाटतंय की तो निर्णय चुकला. महावितरणची पत्रके , त्यांची नागरिकांची सनद ही ग्राहकाची केलेली क्रूर चेष्टा आहे की काय ? असं मला वाटायला लागलं आहे. महावितरणच्या निरनिराळ्या कार्यालयात हेलपाटे मारून , त्यांची चढ्या आवाजातली उद्दाम उ