Posts

Showing posts from August, 2017

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

Image
मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यासाठी येथील दुव्यावर टिचकी मारा. धन्यवाद! ओपन (आंद्रे आगासी) https://aparnachipane.blogspot.com/2017/07/blog-post.html पुस्तकाचे नाव         थिओडोर बून   ( स्कँडल)   लेखक                जॉन ग्रीशाम ह्या पुस्तकाचा नायक, थिओडोर बून हा तेरा वर्षांचा ,  आठव्या इयत्तेत शिकणारा अमेरिकन मुलगा आहे. बाकीच्या ह्या वयाच्या मुलाचं जसं जग असतं ,  तसंच थिओचही आहे. शाळा ,  शाळेचा अभ्यास ,  तिथला डिबेट ग्रुप ,  स्काउट्स बरोबर अधूनमधून कँपिंग ट्रीप इत्यादी. त्याचे आई - वडील दोघेही वकील आहेत.  दोघेही आपल्या कामात अगदी गर्क आहेत .   थिओवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि आईवडीलांच असायला हवं ,  तसं त्याच्यावर बारीक लक्षही आहे. आपण फार वेडेवाकडे उद्योग केले ,  तर आपले आईवडील आपले कान उपटतील हे थिओला अगदी पक्कं ठाऊक आहे. थिओचा एक दारूचं व्यसन असलेला एक काका ,  त्याची एप्रिल नावाची एक मैत्रीण , त्याचा लाडका कुत्रा  ' जज '  आणि इतरही काहीजण ह्या पुस्तकात आपल्याला भेटतात. जेव्हा पुस्तकातले मुख्य पात्र एखादं लहान मूल असतं ,  तेव्हा बऱ्याचदा अशी मुलं 'आदर्

अमेरिकन सूर्यग्रहण

Image
अमेरिकन सूर्यग्रहण आज अमेरिकेत सूर्यग्रहण होतं. काही भागात खग्रास तर काही भागात खंडग्रास. आमच्या गावात खंडग्रास ग्रहण होतं. टी.व्ही. वर बऱ्याच आधीपासून काउंटडाउन सुरु होता. जिथून खग्रास ग्रहण दिसणार होतं, तिथे किती गर्दी होणार आहे, हॉटेल्सची बुकिंग्ज कशी संपत आली आहेत वगैरे वगैरे चर्चा चालू होत्या. जसा जसा दिवस जवळ येऊ लागला, तसं ग्रहण बघताना डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, खास ग्रहण बघण्याचे चष्मे कुठे मिळतील वगैरे विषय पुढे आले. पब्लिक लायब्ररी आणि इतर काही ठिकाणी हे चष्मे फुकट वाटण्यात आले. शेवटच्या दिवशी तर प्रचंड मागणीमुळे वॉलमार्टसारख्या दुकानांमधले चष्मे संपले! आम्ही राहतो, त्या सोसायटीत ग्रहण बघायला आबालवृद्धांची गर्दी झाली होती. ज्यांना हे खास चष्मे मिळाले नव्हते, त्यांना बाकीचे आपले चष्मे देत होते. सगळ्यांनी मिळून निसर्गाच्या ह्या अद्भुत आविष्काराचा आनंद घेतला. बऱ्याच वर्षांनी अमेरिकेत सूर्यग्रहण झालं. हा मुहूर्त साधून इथे काही लग्नं झाली. मला ह्या बातम्या बघताना गंमत वाटत होती. आधीच अमावास्या, त्यात ग्रहण! अशा दिवशी लग्न करायचा विचार भारतात कोणी मनात आणला अस