Posts

Showing posts from September, 2019

आम्र-विक्री योग

मावळ भागातल्या एका खेड्यात आमची थोडी शेतजमीन आहे.   नवऱ्याने मोठ्या आवडीने घेतली ,   तेव्हा अगदी माळरान होतं.   त्याने दर आठवड्यात तिथे चकरा मारून ,   गावकऱ्यांशी मैत्री करून ,  कष्टाने-प्रेमाने त्या जागेला हिरवं केलं.   एकट्यानेच.   घरच्या आणि व्यवसायाच्या व्यापात वर्षावर्षात मी तिथे फिरकत नसे.   तसाही माझा पिंड पूर्णपणे शहरी आहे.   काय भाजी- फळे हवी असतील ,   ती भाजी बाजारातून पाव-अर्धा किलो आणावी आणि खावी एवढीच माझी झेप आहे.   त्यामुळे ह्या लेखातही काही तांत्रिक चुका असल्या ,   तर पोटात घाला. नवऱ्याला मात्र हे उपद्व्याप मनापासून आवडायचे.   नोकरी सांभाळून गहू-तांदूळ-ऊस-ज्वारीची प्रकारची शेती तर जमण्यासारखी नव्हती.   म्हणून मग त्याने तिथे फळझाडे लावायची ठरवली.   कोकणातून आंब्यांची ,   काजूची ,   फणसाची रोपं आणली आणि रुजवली.   सुरवातीला तिथे पाण्याचा प्रश्न होता ,   वीज नव्हती.   हळूहळू ह्या सगळ्या सोयी झाल्या आणि शेत बहरत गेलं.   फळझाडांच्या जोडीला अधूनमधून थोडीफार भाजीची लागवडही सुरू केली.   दर शनिवारी शेतावरून येणाऱ्या ताज्या भाज्यांप्रमाणे आमच्या आठवड्याचा भाज्यांचं वेळाप