Posts

Showing posts from October, 2018

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-१० (लिपूलेख पास ते गाला)

Image
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा भाग ९ : तकलाकोट मुक्काम https://aparnachipane.blogspot.com/2018/10/blog-post_11.html दिनांक ३ जुलै २०११ ( लीपूलेख   खिंड ते गुंजी) लीपूलेखची   शेवटची चढण कशीबशी चढून मी भारताच्या सीमेत पाय टाकला.   सुरेशभाई   लगेच धावत पुढे आला. माझ्या पाठीवरची   सॅक   घेतली , हात धरून जिथे मी नीट उभी राहू शकेन , अश्या जागी   थांबवलं. सगळे जवान , अधिकारी , पोर्टर ,  पोनीवाले   हसऱ्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होते. माझा   पोनीवाला   येऊन ‘  कैसे   हो   दिदी , परिक्रमा ठीक   रही ? ’ अशी चौकशी करून गेला. पाचव्या   बॅच चे   यात्री   तिबेटमध्ये   जाण्यासाठी उभे होते. तिबेटमध्ये जाताना आम्ही ज्या कौतुकाच्या नजरेने पहिल्या   बॅचच्या   यात्रींकडे   बघितलं   होत , तसेच हे   यात्री   आमच्याकडे बघत होते.    ‘ काही त्रास झाला का , हवा कशी होती ? ’   अश्या चौकश्या करत होते.  माझ्या परिचयातले पुण्याचे श्री. व सौ.   रायकर   ह्या   बॅच मध्ये होते. त्या दोघांनी आधीही यात्रा केली होती. यात्रेची तयारी करण्यासाठी त्यांची दोघांचीही खूप मदत झाली होती.