Posts

Showing posts from April, 2023

मी वाचलेलं पुस्तक : केतकर वहिनी

  मी वाचलेलं पुस्तक : केतकर वहिनी लेखिका : उमा कुलकर्णी प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस लेखिका उमाताई कुलकर्णी ह्या मुख्यत्वे कन्नड-मराठी भाषांमधील अनुवादासाठी मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध आहेत. भैरप्पा, शिवराम कारंथ, अनंतमूर्ती, सुधा मूर्ती, गिरीश कार्नाड अशा काही लेखकांनी कन्नड भाषेत लिहिलेल्या पुस्तकांची ओळख त्यांनी मराठी वाचकाला आपल्या उत्तम अनुवादांमधून करून दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी सुनीता देशपांडे ह्यांचं ‘आहे मनोहर तरी’ हे मराठी पुस्तक कन्नडमध्ये भाषांतरित केलं आहे. ‘संवादु अनुवादू’ आणि ‘केतकर वहिनी’ ही त्यांनी लिहिलेली स्वतंत्र पुस्तकं आहेत. त्यातील ‘केतकर वाहिनी’ ह्या पुस्तकाचा परिचय करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. ‘केतकर वहिनी’ म्हणजे मालतीबाई माधवराव केतकर. कोकणात चिपळूणजवळच्या करंबवणे ह्या गावात राहणाऱ्या स्त्रीची कथा उमाताईंनी ह्या पुस्तकात लिहिली आहे. गेल्या शतकाच्या पूर्वार्ध. सातवी पर्यंत शिक्षण झालेली ही मुंबईतल्या मालाडची मुलगी १९३८ साली  कोकणातल्या अत्यंत दुर्गम खेड्यात लग्न करून गेली. त्यांचं सासर केतकर. केतकर त्या भागातले खोत होते. त्यांच्या मालकीची जवळपास दोन