Posts

Showing posts from March, 2017

भाग-2-आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक) भाग-1 वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/03/blog-post_14.html पुणे - मुंबई सेंट्रल - दिल्ली - काठगोदाम (७ आणि ८ जून २०१४) सात जूनला सर्व पुणेकर मंडळी स्वारगेटला जमली. प्रवासाला जाणारे जास्त आनंदात की सोडायला आलेले , ह्याचा निर्णय होत नव्हता! भारतात एशियाड झाल्याला आता तीस वर्षे होऊन गेली , तरी राज्य परिवहनाने ‘ एशियाड बसच्या ’ स्वरूपात ती स्मृती सांभाळून ठेवली आहे. तश्या एशियाड बसमध्ये आमचं रिझर्वेशन होत. सिंहगड एक्प्रेसच तिकीट डेक्कन एक्सप्रेसला वापरलेलं रेल्वेवाल्यांना अजिबात , मुळीच , कधीही चालणार नाही. पण रा.प. वाली मंडळी दयाळू असतात. साडेअकराच्या बसचं तिकीट काढलेलं होत. पण साडेअकराला इथे जी बस उभी होती , ती वेळापत्रकाप्रमाणे पावणेअकराची होती. मास्तरांनी आम्हाला त्या बसमध्ये आमच्याच सीटवर बसून घ्यायला सांगितलं!! कुठल्यातरी बसचं तिकीट काढलंय ना , झालं तर मग.. असा उदार दृष्टिकोन ठेवून त्यांनी आमची व्यवस्था केली. बसची रिझर्वेशन्स मी केली होती. स्वारगेटला येऊन मी समजा ‘ अग , मी तिकीट घ

भाग-१-आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

हा ट्रेक घडायला तशी बरीच कारण घडली. एक कारण म्हणजे सिनेमातल्या   हिरॉइनींना   जसा ‘ आपले बालवय संपून आपण तारुण्यात प्रवेश केला आहे ’, हा शोध अचानक लागतो , तसा मला आणि माझ्या मैत्रिणींना आपण आता चाळीशी पार केली आहे , असा महत्त्वपूर्ण शोध एका महान दिवशी लागला. आता आपल्याला ट्रेकिंग करायला थोडीच वर्षे राहिली , दरवर्षी एक तरी ट्रेक झाला पाहिजे , असा ठराव एकमताने मंजूर झाला. अजून एक कारण म्हणजे माझा मुलगा   तसंच   बाकी मैत्रिणींची मुलं , ह्या सुट्टीत मोकळी होती. सगळ्यांची १० वी- १२ वी अशी महत्त्वाची वर्षे नुकतीच संपली होती. सुट्टीतले क्लासेस आणि तत्सम अडचणी नव्हत्या. त्यामुळे मुलांच्या आघाडीकडून एकदा सगळे मिळून ट्रेकला जाऊया , अशी मागणी जोर धरायला लागली. आमची परदेशी वास्तव्यास असलेली बालमैत्रीण , अश्विनी , भारतात त्याच सुमारास सुट्टीवर येणार होती. ती सुट्टीवर आली की आम्ही नेहमीच भेटतो. पण तसा थोडाच वेळ.   ह्यावेळेला   ती आणि तिची मुलगी अनुजाही आमच्या बरोबर येणार , अस ठरल्यावर आम्ही मार्च महिन्यात   पुन्हा एकदा दिवाळी साजरी करायच्या बेतात होतो. पुणे मनपाच्या इमारतीवर रोषणाई करण्याच

मला आवडलेलं पुस्तक - काबूलनामा

माझ्या आवडत्या लेखिका गौरी देशपांडे ह्यांच्या लेखनाबद्दल वाचण्यासाठी कृपया येथील दुव्यावर टिचकी मारा. धन्यवाद.  गौरी नावाचं गारुड https://aparnachipane.blogspot.com/2017/03/blog-post.html मराठी माणसाची साधारण प्रवृत्ती ही आपल्या पंचक्रोशीत रमण्याची. पण दोन पिढ्यांमागे भाकरीच्या शोधात मूळ गाव सोडून शहराकडे धाव घेणे, हे अपरिहार्य झाले. तरीही बहुधा परिघ मुंबई-पुण्यापर्यंतच राहिला. त्या काळात श्री. फिरोज म्हणजेच पंढरीनाथ रानडे दिल्ली, कलकत्ता, शिलॉंग अश्या सुदूर ठिकाणी कामानिमित्त्य राहिले. तिथल्या अनुभवांनी त्यांचे विश्व विस्तारले गेले. त्यांच्या पत्नी प्रतिभा रानडे ह्यांनी व स्वतः रानडे ह्यांनी त्या अनुभवांवर लेखन केले. श्री. रानडे ह्यांच्या ‘काबूलनामा’ ह्या पुस्तकाविषयी माझे चार शब्द.... काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानची खरं म्हणजे कुठलीच प्रतिमा डोळ्यासमोर नव्हती. नंतर अफगाणिस्तान म्हटलं की डोळ्यासमोर ‘तालीबान, बॉम्बस्फोट, रायफली, निळ्या बुरख्यात लपेटलेल्या स्त्रिया, बामियानच्या उद्ध्वस्त बौद्ध मूर्ती आणि निर्वासितांचे लोंढे’ अस उदास, राखी रंगातलं चित्र उभं राहू लागल

बाई मागच्या बाई—रुक्मिणीबाई

बाई मागच्या बाई — रुक्मिणीबाई ‘ कामावरून येताना दोन किलो ज्वारी नक्की आणा ,  विसरू नका. उद्या बाबा येणार आहेत ना. ते येतील तेव्हा पीठ तयार पाहिजे. ’  हा डायलॉग मारणारी व्यक्ती म्हणजे आमच्या घराच्या कणा असलेल्या   रुक्मिणीबाई! काही वर्षांपूर्वी माझ्या   सासूबाई   आजारी झाल्या ,  हळूहळू अंथरुणाला खिळल्या. अंथरुणावरून उठणे-बसणे ,  जेवण ,  नेहमीचे देहधर्म ह्या सगळ्यासाठीच त्यांना मदतीची गरज भासू लागली. तेव्हा ह्या बाईंची आमच्या कुटुंबात   एंट्री झाली.  ते दिवस अस्वस्थतेचे होते.   सासूबाईच्या   आजारपणाच दडपण सगळ्यांच्याच मनावर होत. घराची इतके दिवस असलेली घडी डोळ्यासमोर विस्कटताना दिसत होती.  आम्ही दोघही काम करणारे ,  मुलगा लहान ,  सासरे वृद्ध. दिवसाचे चोवीस तास कोणीतरी मदतनीस असणं ही तीव्र गरज होती. पण ह्या बायकांच्या   अस्तित्वाचं   एक दडपण येत. त्यांच्यासमोर बोलायला ,  जेवायला संकोच वाटतो. त्यांच्या स्वच्छतेच्या सवयी ,  व्यसने ,  घरातला सततचा वावर ,  स्वभाव अशा सगळ्या गोष्टींशी आपलं कसं जुळणार ,  अशी भीती वाटत होती. अशा विस्कळीत   मन:स्थितीत   असताना ,  कोणाच्या तरी ओळखीन

काळरात्रीनंतरचा उषःकाल

भारतमातेला जखडून ठेवणाऱ्या पारतंत्र्याच्या बेड्यांनी अस्वस्थ झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भगीरथ प्रयत्न केल्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याग ,  बलिदानांनंतर   मिळालेल्या ह्या स्वातंत्र्याचे अप्रूप सगळ्या भारतीयांना होते. समाजात , राजकारणात   मूल्यांची ,  तत्त्वांची   चाड असलेली माणसं अजून कार्यरत होती. हळूहळू काळ बदलत गेला , भाबडेपणा संपत गेला. १९६२ च्या चीन युद्धाच्या घावाने तर कंबरडे मोडले. स्वातंत्र्यापासून आपले पंतप्रधान असणारे सहृदय नेते पं.नेहरू ह्याचं निधन झालं.   लालबहादुर   शास्त्रींच्या अकाली निधनानंतर इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. अजूनही जुन्या विचारांच्या जोखडाखाली असलेल्या   रुढीप्रधान   देशासाठी ही एक उल्लेखनीय घटना होती. १९६९ मध्ये आपल्या पक्षाच्या महारथींचा पराभव केल्यावर   इंदिराजींची   जनमानसातील प्रतिमा खूपच उंचावली. आता सोन्याचे दिवस दूर नाहीत , अशी आशा जनसामान्यांना वाटू लागली. १९७१ मध्ये त्यांनी ज्या तडफेने आणि मुत्सद्दीपणे बांगलादेशाची निर्मिती करून पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली , त्याने प्रभावीत होऊन माननीय