मी वाचलेले पुस्तक: ओपन (आंद्रे आगासी)

मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यासाठी येथील दुव्यावर टिचकी मारा. धन्यवाद!
काबुलनामा लेखक-श्री.फिरोझ रानडे https://aparnachipane.blogspot.com/2017/03/blog-post_76.html

नव्वदीच्या दशकात ज्यांनी टेनिस बघितलं असेलत्यांना १९९२ मध्ये विम्बल्डन जिंकणारा आंद्रे आगासी नक्कीच आठवत असेल. 'ग्रँड स्लॅम' स्पर्धेतील त्याचे ते पहिले विजेतेपद होते. क्रीडा समीक्षकांचेटीकाकारांचे मत 'आगासी कधीच 'ग्रँड स्लॅम जिंकू शकणार नाही',असे होते. ह्या पार्श्वभूमीवर त्याने मिळवलेल्या ह्या विजयाचे महत्त्व त्याच्या दृष्टीने मोठे होते. डोळ्यातून वाहणाऱ्या आनंदाश्रूंनी त्याच्या त्या भावना सगळ्या जगापर्यंत पोचल्या.

एकवीस वर्षे व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळल्यावर आगासी २००६ साली निवृत्त झाला. त्याचे 'ओपनहे २०१० साली प्रसिद्ध झालेले आत्मचरित्र त्याच्या लहानपणापासून ते निवृत्त आयुष्यात तो करत असलेल्या समाजोपयोगी कामांपर्यंत खुलेपणाने सांगते.

आंद्रे चार भावंडात सगळ्यात लहान. अमेरिकेतील 'ला व्हेगासह्या गावात राहणारा. आगासीच्या वडिलांनी तो लहान असतानाच तो टेनिस चॅम्पियन होणार. जगातला एक नंबरचा खेळाडू होणारहे ठरवून टाकलं होतं. ते क्रूर नव्हतेपण ठाम नक्की होते. त्यांनी आगासी लहान असतानाच घराच्या मागच्या दारी टेनिस कोर्ट तयार केलं होतं. एक बॉल मशीन स्वतः तयार केलं होतं. जवळपास पाळण्यात असल्यापासूनच आगासीच ट्रेनिंग त्यांनी सुरू केलं. दिवसातले ठराविक तास हे टेनिस कोर्टवर प्रॅक्टिस झाली'चंपाहिजेहा कडक नियम होता. सातव्या-आठव्या वर्षापासून तो त्याच्यापेक्षा मोठ्या खेळाडूंशी खेळायला लागला आणि जिंकायलाही लागला.  

तो तेरा-चौदा वर्षांचा असताना वडिलांनी त्याला फ्लोरिडाला एका टेनिस अॅकॅडमीमध्ये रवाना केलं. दिवसा शाळा आणि बाकीचा वेळ टेनिस. आगासी ह्या अॅकॅडमीचं वर्णन चक्क 'तुरुंगअसं करतो! नवव्या इयत्तेत शाळा सोडून पंधराव्या वर्षीच तो व्यावसायिक खेळाडू झाला आणि सगळ्यांचं लक्ष त्याने आपल्या चमकदार खेळाने आणि पठडीबाहेरच्या वागण्याने वेधून घेतलं.

त्याला टेनिस अगदी मनापासून आवडायचं नाही. इतक्या लहान वयात आपल्या कुटुंबापासून तुटल्यामुळे  तो मनाने सैरभैर झाला होता. पण शिक्षणाची हेळसांड झाली होती आणि टेनिस सोडून बाकी काही कौशल्य अंगी नव्हतं. त्यामुळे टेनिस खेळण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्यायही डोळ्यासमोर नव्हता. आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहेहे उमजत नव्हतं. मग ती तगमगती ओढाताणबंड करायची अनिवार इच्छा, त्याचे चित्रविचित्र केसकपडे आणि टेनिस कोर्टवरची आणि बाहेरची अनिर्बध वागणूक ह्यातून प्रकट होऊ लागली.

आपण ह्या खेळाडूंना एकतर टी. व्ही. च्या पडद्यावर हरतानाजिंकतानाआनंदाने नाहीतर दुःखाने रडताना बघतो. वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल येणाऱ्या चांगल्या- वाईट बातम्या वाचतो. पण त्यापलीकडे असणारा खडतर प्रवास आपल्याला कधी फार कळत नाही. बहुतेक खेळाडू अगदी लहाननकळत्या वयात खेळायला सुरवात करतात. दिवसातला मोठा भाग प्रॅक्टिसट्रेनिंग मध्ये जातो. त्यामुळे अपरिहार्यपणे शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. सतत प्रवाससतत स्पर्धाहार-जीत आणि त्यासोबत आशा निराशेचा जीवघेणा खेळ. कुटुंबाच्या उबदार चौकटीतून ही पाखरं वेळेआधीच पंख फुटून उडून जातात.

मनाने खंबीर असलेलेविचारांचं-संस्कारांचं पाठबळ असलेले खेळाडू ह्या परिस्थितीतही आपलं ध्येयावरचं लक्ष अढळ ठेवतात. काहीजण मात्र रस्ता चुकतात. हातात पैसा असतोतारुण्याची रग असतेलहान वयात मिळालेली भरपूर प्रसिद्धीही असते. ह्यांतलं एक कारणही पाय घसरायला पुरेसं असत. मग सगळी एकत्र आल्यावर तर काय?

आगासीचही काही वेगळं झालं नाही. मोठ्या स्पर्धा जिंकताना वारंवार येणारं अपयशलग्नाचा फसलेला डाव ह्यातून तो नैराश्याकडे,व्यसनाधीनतेकडे ओढला गेला. 'आता हा संपलामुळात तो तेवढा चांगला खेळाडू नव्हताचह्या आवया उठू लागल्या. पण राखेतून जिवंत होणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तो पुन्हा कोर्टवर उतरला. जिंकू लागला. पूर्ण कारकीर्दीत सगळ्या ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि त्यासोबत ऑलिंपिक सुवर्णपदकही जिंकून तो गोल्डन स्लॅमचा मानकरी झाला.

ज्या आंद्रेला शिक्षण आवडत नव्हतशाळा म्हणजे तुरुंग वाटायचा. त्यानेच आता व्हेगासमधल्या वंचित मुलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेता यावेम्हणून शाळा सुरू केली. आगासीला आता खेळताना 'जिंकण्यासाठी जिंकणेह्यापेक्षा महत्त्वाचे ध्येय मिळाले. त्याच्या शाळेसाठी तो टेनिस खेळून निधी जमा करू लागला. त्याच्या बरोबरचे खेळाडू निवृत्त झालेतरी तो आपल्या कुटुंबासाठी,शाळेतल्या मुलांसाठी खेळत राहिला.

त्याच्या वडिलांनी काहीशी जबरदस्ती करून त्याला सराव करायला लावलाह्याबद्दलची तीव्र नाराजी ह्या पुस्तकाच्या पानापानातून जाणवते. काहीशा हट्टीएककल्ली बापाने लहानग्या आंद्रेचं लहानपण 'टेनिसह्या वेठीला गच्च बांधून ठेवलं.

हे बरोबर की चूकह्या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीप्रमाणे बदलेल. काही दिवसांपूर्वी एका हिंदी सिनेमा संदर्भात अशीच चर्चा झाली होती. कुठल्याही कारणाने का असेनाआगासी टेनिस खेळला. त्याने त्यात उल्लेखनीय यश मिळवलं. म्हणजेच त्याच्याकडे टेनिस खेळण्यासाठीचं कौशल्यशारीरिक क्षमता नैसर्गिकरीत्या होती. अथक अशा सरावाने ह्या कौशल्याला पैलू पडले. वडिलांचा रस्ता कदाचित चुकलाही असेल. पण त्यांनी जबरदस्ती नसती केलीतर तो टेनिसपटू झाला असता काकाय माहीत?

थोडीशीच मुलं अशी असतातकी ज्यांना आपल्याला नक्की काय करायचं आहेहे फार लहानपणी लख्ख दिसतं. बाकी मंडळी चाचपडत असतात. आई वडील स्वतःच्या वकुबाप्रमाणे निरनिराळ्या गोष्टींची ओळख करून देतातथोडं ढकलतातही. ओळख करून देणे आणि ढकलणेह्यामध्ये अतिशय धूसर अशी सीमारेषा आहे. आपण नक्की कुठल्या भागात आहोतहा विचार व्यक्तिसापेक्ष आहे. मुलांच्या कोवळ्या शरीरावर आणि मनावर अत्याचार होणेहे चूकच. त्याबद्दल दुमत नाही. ते होत नाही ना, ही काळजी मोठ्यांनी घेणे आणि आपले आई-वडील ही देखील माणसे आहेत. त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात, ही जाणीव मुलांनी जाणत्या वयात ठेवणे, हा मध्यममार्ग होऊ शकतो.

आपण सगळेच चरितार्थासाठी काम करतो. ती आपल्या आवडीचं असतचअसं नाही. 'ह्याकामाऐवजी 'तेकाम मला आवडलं असत,असं शंभरातल्या नव्वद लोकांना तरी वाटत असेल. पण आपल्या चित्राची चौकट कशी असावीहे आपल्या हातात नसलंतरी त्या चौकटीमधील अवकाशात चित्र कसं आणि कोणतं काढायचं, हे मात्र आपल्याच हातात असतं. आंद्रे आगासीने नावडती चौकट वाट्याला आलीतरी त्याच्या शैलीदार फटकाऱ्यांनी चित्रात अप्रतिम रंग भरलेह्याबद्दलची खात्री हे पुस्तक वाचून पटते.

मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यासाठी येथील दुव्यावर टिचकी मारा. धन्यवाद!

थिओडोर बून (स्कँडल) लेखक: जॉन ग्रिशॅम https://aparnachipane.blogspot.com/2017/08/blog-post_29.html

Comments

  1. Aparna !
    Good Book Review ! Keep writing

    ReplyDelete
  2. Motivated to read the book.very nice review and your thinking is very clear. Keep writing about books in English

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for your comment. It gives me lot of encouragement to write.
      My apologies for a very delayed reply.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५