जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-2

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा जीवनज्योती कृषी डायरी - १ https://aparnachipane.blogspot.com/2020/09/blog-post.html प्राथमिक शाळेतल्या बालभारती मराठीच्या पुस्तकात एक भैरूचा धडा होता. ‘ पहाट झाली , भैरू उठला. बैल सोडले. औत घेतले. शेतात जाऊन औत धरले ’ असं काही शेताचं आणि शेतीतल्या कामांचं वर्णन त्यात होतं. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि मर्ढेकरांच्या कवितेतल्या ‘ सकाळी उठोनि चहाकॉफी घ्यावी , तशीच गाठावी वीज-गाडी ’ ह्या वातावरणात वाढलेल्या मुलांना शेतीकामाची इतकीच तोंडओळख असे. पुढे मोठेपणी निरनिराळ्या सरकारी ‘ कृषी आणि बळीराजा ’ वगैरे नावं असलेल्या योजनांच्या जाहिरातीत छानशी नऊवारी साडी-दागिने घातलेली शेतकरीण आणि अक्कडबाज मिश्या असलेले शेतकरी दादा असायचे. पार्श्वभूमीला बहरलेलं शेत आणि पाइपमधून धो-धो पाणी वाहात असायचं आणि जोडप्याच्या टवटवीत हसऱ्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहात असायचा. ह्या सगळ्या गृहपाठामुळे ‘ शेती ’ बहुतेक आपोआप होते. आपण फक्त नऊवारी साडी नेसून हसत-हसत फोटोसाठी उभं राहायचं असतं अ...