माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-११ (गाला ते पुणे)

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा भाग १० : लिपूलेख खिंड ते गाला https://aparnachipane.blogspot.com/2018/10/blog-post_30.html दिनांक ६ जुलै २०११ (गाला ते पुणे) ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आमचा आजचा मुक्काम ‘ सिरखा ’ ह्या कँपला होता. पण नारंग सरांनी बरीच खटपट करून आजच धारचुलाला जायचं नक्की केलं होत. आमच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला ही कल्पना अजिबात आवडली नव्हती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जाताना जे अंतर आम्ही आठवड्यात पार केले होते , तेच अंतर आता आम्ही चार दिवसात पार करणार होतो. खेचरांचा तेवढा वेग नसतो , अशी कुरकूर चालू होती. यात्रींना मात्र एक दिवस लवकर पोचता येईल तर चांगल होईल , असं वाटत होतं. आज चालण्याचा शेवटचा दिवस असल्याने परतीच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा संपणार होता. धारचुला, जागेश्वर, दिल्ली असे तीन मुक्काम झाले, की सगळे आपापल्या घरची वाट पकडणार होते. यात्रा संपत आल्याची हुरहूर आणि घरी जायची वेळ जवळ आली, म्हणून आनंद अशा संमिश्र भावना मनात येत होत्या. ह्या क्षणी मात्र ह्या ...