मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यासाठी येथील दुव्यावर टिचकी मारा. धन्यवाद! ओपन (आंद्रे आगासी) https://aparnachipane.blogspot.com/2017/07/blog-post.html पुस्तकाचे नाव थिओडोर बून ( स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम ह्या पुस्तकाचा नायक, थिओडोर बून हा तेरा वर्षांचा , आठव्या इयत्तेत शिकणारा अमेरिकन मुलगा आहे. बाकीच्या ह्या वयाच्या मुलाचं जसं जग असतं , तसंच थिओचही आहे. शाळा , शाळेचा अभ्यास , तिथला डिबेट ग्रुप , स्काउट्स बरोबर अधूनमधून कँपिंग ट्रीप इत्यादी. त्याचे आई - वडील दोघेही वकील आहेत. दोघेही आपल्या कामात अगदी गर्क आहेत . थिओवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि आईवडीलांच असायला हवं , तसं त्याच्यावर बारीक लक्षही आहे. आपण फार वेडेवाकडे उद्योग केले , तर आपले आईवडील आपले कान उपटतील हे थिओला अगदी पक्कं ठाऊक आहे. थिओचा एक दारूचं व्यसन असलेला एक काका , त्याची एप्रिल नावाची एक मैत्रीण , त्...