मी वाचलेले पुस्तक: ओपन (आंद्रे आगासी)
मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यासाठी येथील दुव्यावर टिचकी मारा. धन्यवाद! काबुलनामा लेखक-श्री.फिरोझ रानडे https://aparnachipane.blogspot.com/2017/03/blog-post_76.html नव्वदीच्या दशकात ज्यांनी टेनिस बघितलं असेल , त्यांना १९९२ मध्ये विम्बल्डन जिंकणारा आंद्रे आगासी नक्कीच आठवत असेल. ' ग्रँड स्लॅम ' स्पर्धेतील त्याचे ते पहिले विजेतेपद होते. क्रीडा समीक्षकांचे , टीकाकारांचे मत ' आगासी कधीच ' ग्रँड स्लॅम जिंकू शकणार नाही ', असे होते. ह्या पार्श्वभूमीवर त्याने मिळवलेल्या ह्या विजयाचे महत्त्व त्याच्या दृष्टीने मोठे होते. डोळ्यातून वाहणाऱ्या आनंदाश्रूंनी त्याच्या त्या भावना सगळ्या जगापर्यंत पोचल्या. एकवीस वर्षे व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळल्यावर आगासी २००६ साली निवृत्त झाला. त्याचे ' ओपन ' हे २०१० साली प्रसिद्ध झालेले आत्मचरित्र त्याच्या लहानपणापासून ते निवृत्त आयुष्यात तो करत असलेल्या समाजोपयोगी कामांपर्यंत खुलेपणाने सांगते. आंद्रे चार भावंडात सगळ्यात लहान. अमेरिकेतील ' ला व्हेगास ' ह्या गावात राहणारा. आगासीच्...