भाग-८ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)
आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक) भाग-7 वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/05/blog-post_19.html बागेश्वर- काठगोदाम – दिल्ली (१७ व १८ जून २०१४) आज बसने नक्की जायचं नाही, जीपने जायचं हे नक्की होत. पण जातीच्या मोशन सिक लोकांना बस / जीप/ विमान / कार / रिक्षा सगळं सारखंच! त्यामुळे सुजाताने तिची मोशन सिकनेस न होण्यासाठीची अत्यावश्यक गोळी जीपमध्ये बसण्याआधीच घेतली आणि ती ‘म्युट मोड’ मध्ये गेली! प्रवासात ती काही खात नाही, पीत नाही, बोलत नाही, हसत नाही, काहीच करत नाही. झोपेतून जाग आलीच, तर अजून किती किलोमीटर प्रवास उरलाय, ह्याचा अर्धोन्मीलित डोळ्यांनी अंदाज तेवढा घेते. आजही सीन तसाच होता. तिने झोपेच्या पहिल्या पायरीवर असताना बागेश्वरला देवेन सरांचा निरोप घेतला. आम्हाला पाणी, थोडा खाऊ विकत घेण्याच्या सूचना दिल्या आणि आधीच झोपेत असलेली पुन्हा झोपून गेली. बाकीची मंडळीही थकलेली होतीच, त्यामुळे ड्रायव्हरच्या शेजारचे सोडून सगळेच हळूहळू झोपले. पण ड्रायव्हरला हे सुख पाहवलं नाही. त्याने मोठ्या आवाजात खास प्रवासात ऐकण्यासाठी जी गाणी निर्माण ...