मी अपर्णा करमरकर.

माझं लहानपण कल्याणला गेलं. तिथल्या बालक मंदीर शाळेत, नंतर ओक हायस्कूलमध्ये शिकले. आर्किटेक्चरच शिक्षण रचना संसद संस्थेच्या अॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चर इथे घेतलं. ह्या सगळ्या काळात शिक्षणाबरोबर कल्याणच्या खाडीत मनसोक्त पोहणे, जी मिळतील ती स_ग_ळी पुस्तके वाचणे हे चालू असायच.

अपर्णा पाटणकरची अपर्णा करमरकर होऊन पुण्यात आले. स्वतःचा व्यवसाय सुरु केला. पोटापाण्यासाठीचा हा उद्योग आणि संसार करता करता डोंगर-दऱ्या हिंडणे, विणकाम, भरतकाम करणे, वाचणे हे चालूच होतं. त्याबद्दल लिहावं, असं मात्र कधीही मनात आलं नव्हतं.

२०११ साली कैलास-मानस सरोवर यात्रा करण्याचा योग आला. त्याबद्दल लिहिण्याच्या भावाने केलेल्या आग्रहाला बळी पडून प्रयत्न केला. नंतर त्याची चटक लागली. त्याचाच परिणाम म्हणजे हा ब्लॉग!

माझं लिखाण आवडलं आणि तसं कळवलत, तर छानच. पण नाही आवडलं, तर मात्र न विसरता सांगा, बर का?

Comments

Popular posts from this blog

जीवन ज्योती कृषी डायरी - भाग ७ धीरे धीरे रे मना.....

आनंदाचा कंद : लंपन

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ६ 'फेर आई रे मौरा '