माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-७ (परिक्रमा महाकैलासाची)
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा भाग ६ : लिपूलेख खिंड ते दारचेन https://aparnachipane.blogspot.com/2018/09/blog-post_20.html दिनांक २३ जून २०११ ( दारचेन ते डेरापूक ) आज आमची कैलास परिक्रमा सुरू होणार होती. परिक्रमा मार्गावर फोनची सोय नाही. त्यामुळे सगळ्यांनी घरी फोन करून आपापली खुशाली कळवली. परिक्रमा संपवून पुन्हा दारचेनला आलो, की नंतरच घरच्यांचा आवाज ऐकायला मिळणार होता. तीन दिवसांनी पुन्हा ह्याच कँपवर येणार होतो. त्यामुळे परिक्रमेच्या तीन दिवसाकरता लागेल तितकेच सामान लहान सॅक मध्ये घेतलं होत. बाकीचं सामान इथे दारचेनला ठेवलं होतं. २० , २१ , २२ जून तीन दिवस आराम झाला होता. आता परत चालायला सुरवात करायची होती. हे चालणं साधं-सरळ नव्हतं , खूप कठीण होतं. तीन दिवसांच्या आणि ५४ किलोमीटरच्या परिक्रमेला दारचेन ह्या १५५५० फुटांवर असलेल्या कँपपासून सुरवात होते. परिक्रमेचा पहिला मुक्काम २२ किलोमीटर दूर फुटांवरील डेरापुक ह्या ठिकाणी असतो. त्या जागेची समुद्रसपाटीपासून उंची १६३०० आहे.परिक्रमेतील सगळ्यात उंच ठिकाण म्हणजे ‘ डोल्मा पास...